marathi blogs widgets

अनुवाद.....

कचर्‍यासारखी मुंबई
प्रशांत गायकवाड प्रसि्द्धी - आपलं महानगर
मुंबई मिरर या वृत्तपत्रात आलेल्या अहवालाचा अनुवाद
मोगलांना उत्तम सौदर्ययाची जाण होती हिंदूस्थानात दुर्घंधी पसरू नये यासाठी त्यांनी सुगंधी अशा रमणीय उद्यानांची निर्मिती केली होती. ही झाली तेव्हाची गोष्ट ; पण आज काय परिस्थिती आहे ?

मुंबई महापीकेचे घनकचरा व्यवस्थापन खाते पसरणार्‍या दुर्गंधीविषयी चेष्टा झाली आहे. शहराला कचर्‍यानं वेढलं आहे. आज आपण डोळ्यांवर पट्टी बांधुन फिरत आहात पण आपण हे विसरलो आहे की या शहराचे आपणही एक भाग आहोत. तिकडे सायन(शीव) ला मलमुत्र आणि घाणीच्या दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं आहे . दादरला भाजी मार्केट जवळ वाया गेलेल्या भाज्यांचा खच पडला आहे. त्यांवा वास तिथून जाताना डोळेही झोंबतात , शिवडी ला डोकं गरागरा फिरवणारा माशांचा दुर्गंध. त्याचबरोबर जवळ जवळ सर्वच रेल्वे पटर्‍यांवरून येणारा आपल्या घाणेंद्रीयांना सहन न होणारा घट्ट आणि चिकट तेलातील माशांचा वास, तसचं पुर्व उपनगरातील भांडुपला जळणारे प्लास्टीक त्यामुळे होणारं प्रदुषण, माहिम आणि कुर्ला येथे येणारा खाडीचा वास आदी गोष्टींमुळे शहराचं सौंदर्य बिघडल गेलं आहे. घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कर्मचाऱ्यांनी आपल्याभोवती हा गळफास आवळलाय.जगातील महत्वाच्या शहरामंध्ये झालेल्या राष्ट्रीय आरोग्यविषयक धोरणाच्या सर्व्हेक्षणात मुंबई 46 व्या स्थानावर अशक्त होऊन खितपत पडली आहे. आपण प्रथम फेकून दिलेला कचरा आणि गरिबांच्या आरोग्य रक्षणार्थ घ्यायची जबाबदारी समजून घेतली पाहीजे. मगच आपण डेंग्यू . मेलरिया आणि विषबाधा या वेगानं पसरत जाणाऱ्या रोगांना दोष देऊ शकतो. वांद्रयाचा लिंकिंग रोड हा अतिशय छान परिसर आहे तेथील सकाळी ची साडे सहाची वेळ , पालिकेच्या 60 हजार सफाई कर्मचाऱ्यांपैकी एक असणारा सुनिल (25) नावाचा चेहरा. जेव्हापासून त्यानं कामासाठी ऑरेंज ऍप्रन घातला तेव्हापासून तो दारू पिऊन रात्री घरी उशिरा येतोय.आपण चैनबाजीच्या दिवसांना विसरल्याची त्याला जाणिव होत आहे.आता त्याची झाडू सफाईकरता सज्ज झाली आहे. यापुढील दोन तासांत वाहतूक वाढत जाणार आहे. सुनिल खूप परिश्रम घेऊन त्याला नेमून दिलेला 500 मीटरच्या परिसरात तो रस्ते आणि पदपथ स्वच्छ करतो . त्यात हल्लीच्या पेव्हर ब्लॉक्स मधील साठलेला कचराही आला. 9: 30 वाजल्यानंतर फेरिवाले इथे पोहोचतात. त्यांनी पिशव्यांचे बोचके उघडल्यावर त्यातून निळ्या, हिरव्या,पांढऱ्या , गुलाबी रंगाच्या पिशव्या उडतात. जस काही बॉलिवुडचा अभिनेता साम मेंडस याच्या अमेरिकन ब्युटी या चित्रपटातलच दृश्य असाव , तशा त्या पिशव्या वार्‍याच्या जोरदार झोतात एके ठीकाणी निरर्थकपणे फिरतात नंतर काही क्षणातच रस्त्याच्या कडेला विखुरतात. त्यामुळं सुनिलला आता अधिक मेहनत करावी लागेल. हळू हळू येथील दुकानं उघडू लागतील, दुकानदार कचरा पदपथावर टाकू लागतील ,त्यात जुनी वर्तमानपत्र,सुकं गवत, थर्माकोल च्या शीट्‌स आदी वस्तू असतात . त्या उडत उडत जाऊन बाहेर पसरतात त्याचबरोबर खाण्याच पान , केळ्यांच्या साली , गुटख्याची पाकिट , माचिस च्या काड्या ,सिगारेटची थोटकं , निरुपयोगी धान्य , टाकून दिलेली बुटं ,रिकाम्या बाटल्या , तुटलेल्या काचा , लाकडाचा भुसा, थुंकलेला चिकट कफ ,केसं ,पातळ पत्रा ,जुने दात घासण्याचे ब्रश ,फाटक्या बॅगा , हे सर्व रस्त्यावर पडलेले असते. सुनिल दररोज हे भयानक चित्र पाहत असतो.तो फक्त दिवसाला 150 रुपये रोजंदारीवर काम करतो. जास्त पैसे कमावण्याचं स्वप्न तो पाहत नाही. तो फक्त एकच इच्छा व्यक्त करतो की कचरा टाकताना लोकांनी आजूबाजूला कचराकुंड्या आहेत की नाही हे पहायला हवे. सहा हजार पाचशे मेट्रीक टन कचरा मुंबईत दररोज जमा होतो. त्यात बांधकाम आणि ओला कचरा अजूनही मोजलेला नाही. याबाबत मल:निसारण खात एक उदाहरण देतं की , हा जमा केलेला कचरा वानखेडे स्टेडियम वर टाकला तर 60 दिवसांत 100 फुट इतक्या उंच कचर्‍याच्या भिंती तयार होतील. हा फक्त पालीका जमा करते तो कचरा आहे. मुंबईत त्यापेक्षा कितीतरी जास्त कचरा आहे. त्याचे मोजमाप अजुनही झालेले नाही. म्हणूनच मुंबई हे जगातील जास्त कचरा असणारं शहर मानलं जातं.

बोरीबंदर जवळील मुंबई महानगरपालीकेची इमारत. तेथे अप्पर पालीका आयुक्त आशिष कुमार सिंग यांच पुर्ण सोयीसुविधांनीयुक्त असं कार्यालय आहे.त्यात परिषदेसाठी टेबल , 42 इंचाचा एल.सी.डी .टि व्ही.,आणि नवीन आयमॅक आहे. त्यांच्या सहकाऱ्यांत त्यांची शांत स्वभावाचा अधिकारी अशी ओळख आहे. सिंग यांच्यावर मुंबई स्वच्छ करण्याची जबाबदारी आहे. ते म्हणतात रस्त्यावर कचरा किती आहे हे तुम्ही तुमच्या डोळ्यांवरून ठरवू शकता. तुमचे घर आणि पंचतारांकित हॉटेल मध्ये किती फरक आहे तो पहा. तिथे साफसफाईसाठी आधुनिक उपकरण आहेत, तर घरात साध्या झाडूनं आपण साफसफाई करतो. त्यामूळे घराची कितीही साफसफाई केली तरी ते आपल्याला कमीच वाटते. मुंबईचा कचरा हा तसाच आहे . 60 टक्के मुंबई झोपड्यांनी व्यापलेली आहे. रिओनार्ड जे निरीआो किंवा जोहान्सबर्ग ही मुंबईसारखीच शहर आहेत . त्या ठिकाणी या शहरीकरणाला मर्यादा आहेत. तिथे शहराची वर्गानुसार विभागणी झाली आहे. मुंबईत उच्च आणि मध्यम वर्गाच्या गृहनिर्माण संस्था आहेत पण पहायला गेल्यास या संस्थांच्या आजूबाजूलाच झोपड्या वसलेल्या आढळतात. कारण या झोपड्यातील बायका याच घरात साफसफाई ,कचरा आणि धूणीभांडीसाठी जातात. आज या झोपड्यांमुळे संपुर्ण मुंबई झोपड्यांसारखीच भासत आहे. येणाऱ्या भविष्यात मुंबईत झोपडपट्‌टी पुर्नवसन प्रकल्प राबवण्यात येईल. याबाबत सिंग म्हणतात, लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल अज्ञान आहे. लोकं नेहमी कचरा दिसू नये अशी जागा शोधतात आणि तो लपवतात. दक्षीण मुंबईत अतिशय अरुंद गल्लीबोळे आहेत. तिथे फक्त मरतुकडा माणुसच जाऊ शकतो. माणसं चिकन खातात. तुकडे आणि हाडे खिडकीतून बाहेर टाकतात. तिथे साफसफाई कशी होणार? एवढ्याश्या छोट्या गल्लीबोळांमुळे माणसं आजाराला निमंत्रण देत आहेत. महालिकेची व्यवस्था अकार्यक्षम झाली आहे . कर्मचारी कामावर येत नाहीत, कामगार आजारी पडतात. काही ठीकाणी व्यवस्था भ्रष्ट झाली आहे. शहर स्वच्छ करण आता अशक्य आहे. लोकच हे शहर अस्वच्छ करत आहेत. याबाबत सिंग यांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की तुम्ही लोकांना सुज्ञान करा . शेरेबाजी करू नका.

मुंबईची साफसफाई

मुंबईचं कचरा व्यवस्थापन खाते सर्व स्तरावर नापास झालं आहे. या खात्याशी महापालीकेचे अनेक कर्मचारी संबंधित आहेत.उदा. रुग्णालयं, शाळा आणि शासकीय संस्था .जवजवळ 60 हजार एवढे कर्मचारी आहेत. 21 हजार रस्ते सफाई कामगार असून त्यांच्याशी संबंधीत काम करणारे 6600 कामगार आहेत. यांच्याकडून दिवसातून दोनदा सफाई केली जाते .आणि कचरा तीनवेळा गोळा केला जातो. पण महत्वाचं काम सकाळी वाहतूक सुरू होण्याआधीच केलं जातं असं घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मुख्य अभियंता बी.पी.पाटील म्हणतात.
4500 क्षेत्राची सफाई करण्यासाठी 6500 जणांची कंत्राटी पद्धतीवर भरती केलेली आहे. 500 मीटरचा विभागाची रस्ते स्वच्छता करण्यासाठी प्रत्येकी दोन कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. पण मेहनत घेऊनही फक्त 20 टक्केच साफसफाई होते. जास्तीत जास्त म्हणजे 50 टक्के कचरा गृहनिर्माण संस्थांच्या घराघरांतूनच गोळा केला जातो. महापालीकेनं या आधी एक आराखडा आखला होता. ओला आणि सुका कचरा वेगळा केला गेला पाहीजे. आपल्या घरी कचरा घ्यायला येणाऱ्या व्यक्तीकडे आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला पाहीजे.पण पालीकेच्या या अभियानाची अंमलबाजावणी काही ठीकाणीच होताना दिसते. कचरा वेचणाऱ्या किंवा घराघरांत जाऊन कचरा घेणारे स्वत:हून कचरा वेचतात. कचऱ्यातून जे काही घ्यायचे आहे ते स्वत:च घेतात. त्यांना कचरा व्यवस्थापनं खात्यानं आमच्या सोबत काम करा असं विचारल्यावर ते नकार देतात. का ते त्यांवं त्यांनाच माहित.
पालीकेनं ठराविक वेळात सोसायट्यांत जाऊन काम करण्यास सांगितलं आहे पण कर्मचारी जात नाहीत. त्यामुळे कचरा पेट्यांत कचरा साठत आहे. जिथे जास्त प्रमाणात माणस राहत असतील तिथे मोठ्या प्रमाणात कचरा साठत जाणारच . मुख्य अडचण ही आहे की लोकांना आपल्या घराजवळ कचरापेटी नको हवी आहे. अश्या वेळी आमच्या व्यवस्थापनाला दुरध्वनी यायचा . जेव्हा आम्ही कचरापेटी या ठीकाणाहून दुसऱ्या ठीकाणी ठेवायचो तेव्हा लगेच दुसरा फोन यायचा . मग बऱ्याच वेळा कचरापेट्या इथून तिथे हलवण्यात वेळ जायचा. त्याचा परिणाम कचरापेटी भरण्यावर व्हायचा असं अधिकारी म्हणतात. कचरा साठण्यामुळे असं वाटतं की जणु काही मिनी डंपींग ग्राऊंडच तयार झालय. या पेट्या आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक आहेत, या कचरा पेट्या कचरा वेचणाऱ्यांना आकर्षित करातात तसंच कुत्रे ,डुक्कर ,लघुशंका यांना प्रोत्साहन मिळते.

जमीनीचा भराव

19 व्या शतकात मुंबईचं घनचरा व्यवस्थापनं खातं ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होते, बैलगाडीतून कचरा जमा केला जायचा. नंतरच्या काळात मोठमोठ्या गाड्यांधून कचरा नेण्यात आला. सायनपर्यंतच त्यांची हद्द होती. नंतर त्याच्या विस्तार झाला. या कचऱ्याची पुर्नप्रक्रीया सुरू झाली. त्याची इंडस्ट्री धारावी-सायन-कुर्ला-गोरेगाव -भांडूप इथे विस्तारली होेती. आता 75 टक्क्यांहून जास्त कचरा यांत्रिकी गाड्यांमधुन देवनार ला जातो. आणि उरलेला मुलुंड ला जातो. पावसाळ्याच्या हंगामात दलदलीचा भाग निर्माण होतो. देवनारला या भागात भराव टाकला जाता. त्यासाठी बुट ,टायर, वर्तमानपत्र आदिंचा वापर करतात. यामुळे दलदलीची जागा मजबूत होते. कचरा उद्योगानं लोकांना रोजदांरी मिळाली आहे,कचऱ्याच्या ढिगात कचरा वेचणारे त्यांच्यासाठी गरजेच्या वस्तू गोळा करतात आणि विकतात. काही स्वत:च्या घरासाठी वापरतात.
देवनारच्या19.6 हेक्टर असणाऱ्या या क्षेत्रावर गुन्ह्यांची संख्या वाढलेली आहे.चोऱ्या आणि खुन होऊ नये यासाठी तेथे सुरक्षारक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे.या ठीकाणी गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या आहेत आणि इथे त्यांची दहशत आहे. दररोज 1200 कचऱ्याचे ट्रक इथे येतात. त्यामुळे अंदाजे 4500 मेट्रीक टन इतका कचरा तेथे जमा होतो.
या ढिगाऱ्याच्या एका बाजूला निमशासकीय दवाखाना आहे तेथे डॉ.राहील कमार बसतात. रंगाने ते गोरेपान आहेत. त्यांनी केसाला हिनाचे डाय लावलेलं आहे. तोंडाला मास आहे. या पेहरावामुळे ते अनोळखी भासतात. चहूबाजूला असणाऱ्या कचऱ्याच्या वातावरणाबाबत ते बोलतात याचा माझ्या आरोग्यावर परिणाम होत नाही कारण मी त्याबाबत आवश्यक ती दक्षता बाळगतो. आजूबाजूला असणाऱ्या मुलांना ते गटारी मुलं म्हणुन हिणवतात. कारण या मुलांना काहिच आयुष्य नाही . रसायन आणि येथील दुर्गंधीमुळे ते बोलतय असतील कदाचित. या त्रासापासून वाचण्यासाठी ही मुलं अंमलीपदार्थांचे सेवन ही करतात असंही डॉक्टर म्हणतात.

शहरात सुरू असणारी कामे
आज शहरात अनेक नविन प्रक ल्प येऊ घातले आहेत. उदा. उड्डाणपुलं , मेट्रो , नविन बांधकाम. यामुळे शहरात अहोरात्र बांधकामं चालू आहेत त्यामूळे मोठ्या प्रमाणावर या बांधकामाचा कचरा जमा होत आहे. आणि हिच बाब मुंबई महापालीकेची गंभीर डोकेदुखी बनली आहे. खासगी बिल्डर्स आपल्या बांधकामाचे ढीगारे दुसरीकडे आणून टाकतात. त्यासाठी ते महापालीकेची परवानगी घेत नाहीत. बांधकामाचा कचरा टाकण्याचे काम रात्रीच्या वेळेस चालते. सकाळी पश्चिम दृतगती मार्गावर किंवा इतरत्रही तुम्ही पाहील्यास अचानक या बांधकामाचा कचरा आपल्याला दिसतो आणि आपण विचार करतो कालपर्यंत तर हा कचरा नव्हता अचानक आला कुठून? याबाबतचे कायदे अतिशय कडक आहेत आणि या बिल्डर मंडळींना अश्या कामासाठी खूप मोठ्या रकमेचा दंडही भरावा लागतो. पालीकेचे अधिकारी याकडे काणाडोळा करतात. या बाबत मुख्य अभियंता पाटील म्हणतात की दररोज 2500 मेट्रीक टन इतका बांधकाम कचरा जमा होतो. पालिका कर्मचारी यावर देखरेख ठेवतात. हा कचरा घेऊन येणाऱ्या प्रत्येक ट्रकवर लक्ष दिले जाते.
यावरील उपाय.
मुंबईत कचरा जमा करण्यासाठी यांत्रिकीकरण व्हायला हवं. संपुर्णपणे आधुनिक यंत्रसामुग्री वापरल्याने कचरा कमी होण्यास मदत होईल पण यामुळे हजारो लोकांचा रोजगार जाऊ शकतो . त्यासाठी मुळात समस्या काय आहे ते समजून घेतलं पाहीजे .या आधी पालीकेनं अनेक योजना राबवल्या. लोकांमध्ये जनजागृतीही केली. पण जनता अनुत्सुक दिसत आहे. सध्या क्लिन अप ची योजना राबवली जात आहे. मुंबईतल्या काही ठीकाणी सिगारेट पिऊन थोटक जमिनीवर टाकणारे, रस्त्यावर थुंकणारे यांना हे क्लीन बीट अप मार्शल पकडत आहेत आणि 100 ते 200 रुपयांचा दंड करत आहेत. पावत्याही देत आहेत,पण याने ंसमस्या सुटणार आहे का?तर नाही. काही वेळा या बीट अप मार्शल आणि पकडल्या गेलेल्या माणसांमध्ये भांडणेही होत आहेत. एवढेच आहे तर सिगारेट , पान, गुटखा यावर बंदी घालाना म्हणजे प्रश्नच सुटेल असं लोकांकडून सांगण्यात येत आहे. यात असं आहे की अनेक छोट्या छोट्या गोष्टींनी कचरा जमा होत असतो. आपल्या महानगराचा आवाका खूप मोठा आहे. त्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांवर संपुर्ण देखरेख करण आवश्यक आहे. आठवड्याला संबंधीत विभागाच्या मुख्य अधिकऱ्यानं कचऱ्याची साफसफाई आणि विल्हेवाट कशी लावली जात आहे याकडे जबाबदारीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे. अनेक स्वयंसेवी संस्था , मोठ्या प्रमाणावर असणारा विद्यार्थी वर्ग यांचे सहकार्य घेतलं गेलं पाहीजे. आपलं शहर ,स्वच्छ शहर अश्या घोषणा वा स्टीकर्सनं काही होणार नाही. पण आज थोडा थोडा बदल असा दिसू लागला आहे की सकाळी कर्मचारी रस्ता साफ करताना दिसले की लोकं थुंकताना किंवा घाण टाकताना विचार करत आहेत. कचऱ्याची पुर्नप्रक्रीया या उद्योगाला प्रोत्साहन मिळाले पाहीजे. डंपींग ग्राऊंड शहराच्या बाहेर गेले पाहीजेत. अश्या अनेक कारणांनी मुंबई सुंदर दिसू शकेल असे वाटते.
____________________________________________________________________________________________________________________________________________________________________

औद्योगिक
प्रशिक्षण संस्था (आयटीआय): खासगी कारखान्यांचे पाठबळ
प्रशांत गायकवाड - दै. महानगर
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढले आहे. अनेक इंजिनिअरिंग उद्योग येथे येत आहेत. रिलायन्स, जॉन्सन टाईल्स अशी अनेक नावं सांगता येतील. हे लक्षात घेऊन शासनाने आयटीआयला खासगी कारखान्यांचे पाठबळ देण्याचे सुचवले. जेणेकरून प्रशिक्षित असे कुशल कामगार तयार होतील. स्थानिकांना रोजगार मिळेल. हे आयटीआय या कंपन्या दत्तक म्हणून चालवायला घेणार आहेत.शासनाने 2008 साली या कल्पनेची पायाभरणी केली. 2140 पैकी 1390 आयटीआय दत्तक म्हणून चालवायला दिले आहेत. रायगड जिल्हा विभागात 10 कंपन्यांनी 13 आयटीआय दत्तक म्हणून चालवायला घेतल्या आहेत. त्यासाठी पीपीपी( पब्लिक - पायव्हेट पार्टनरशिप) या मॉडेलनुसार काम केलं जाणार आहे.
याबाबत नागोठणे, रायगड येथील आयटीआयचे प्राचार्य लोहार म्हणतात, शासनाने खासगी कंपन्यांना आयटीआयमध्ये सामील करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे संस्थेचे एक प्रकारे पुनरुज्जीवनच आहे. लोहार 1990 पासून विविध आयटीआयमध्ये प्रमुख राहिले आहेत.
या नव्या बदलाबाबत स्टीलचे उत्पादन करणाऱ्या इस्पातचे उदाहरण देता येईल. शासनाला महाराष्ट्रातील आयटीआयचे नव्याने अत्याधुनिकरण करायचे आहे. 10 आयटीआय रायगड जिल्ह्यातील डवली या गावात स्थापित करण्याचे ठरवले आहे. त्यामागे स्थानिकांना रोजगार मिळावा असा उद्देश आहे. इस्पातचे एच. आर. प्रमुख आणि अध्यक्ष प्रदीप पांडे म्हणतात की आम्हाला आमची स्टील उत्पादनाची क्षमता 2012 पर्यंत 16 टक्क्यांपर्यंत वाढवायची आहे. त्यासाठी आम्हाला 1000 हून अधिक कुशल कामगारांची गरज भासणार आहे. आयटीआयला दत्तक घेतल्याने आम्हाला कुशल कामगार मिळतील. आमचा उद्योग अशा प्रकारे आयटीआयच्या कामात सहभाग नोंदवत आहे. आमची खार, कर्जत आणि गडचिरोली येथील आयटीआयमध्ये भागीदारी आहे. या आयटीआयमुळे आम्हाला तेथूनच माफक मोबदल्यात कामगार मिळतात. असं रुस्तमजी ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष कवी लुथ्रा म्हणतात.
प्रत्येक आयटीआयचे नियामक मंडळ असते. त्यात इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी(आयएमसी)चे सहा सदस्य आणि खासगी कंपन्यांचे पाच प्रतिनिधी(विविध आस्थापनांकडून) सामील असतात. कंपन्यांचे प्रतिनिधी मंडळावरील अध्यक्षाचे नाव सुचवतात, त्या द्वारे आयटीआय शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असे चालवण्यात येतील. त्यासाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी स्वायत्तता धोेरणही आखण्यात येईल. राज्य सरकार आटीआयमध्ये मुख्याध्यापकांची नेमणूक आणि खर्चिक बाजू यांचा विचार करते. पीपीपी मॉडेलचा दोन भागांत अवलंब करण्यात येणार आहे.पहिल्या मॉडेलमध्ये सरकार आयटीआयसाठी विनाव्याज असे 2.5 कोटी रु. कर्ज 30 वर्षांसाठी उपलब्ध करणार आहे आणि दुसऱ्या भागात जागतिक बॅंक आयटीआयसाठी 3.5 कोटी रु. इतके अर्थसाहाय्य करणार आहे.
उच्च शिक्षण मंत्रालय आणि प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक जे.डी.भूतांगे म्हणतात, आता 1396 आटीआय पीपीपी मॉडेलनुसार वापरायचे आम्ही निश्चित केले आहे. 500 आयटीआय याआधीच या मॉडेलनुसार चालत आहेत. 400 वर्ल्ड आयटीसाठी जागतिक बॅंकेने साहाय्य केले आहे. या कंपन्यांची शिफारस सीआयआय, फिक्की आणि असोकेम या औद्योगिक मंडळांकडून होते. टाटा मोटर्स , महिंद्रा आणि महिंद्रा , जेएसडब्लू स्टील , बजाज ऑटो , टोयोटा किर्लोस्कर आणि भारत फोर्ज या प्रतिष्ठित कंपन्यांनी आयटीआय दत्तक घेतले आहेत. आयएमसी किंवा आयटीआयसाठी पीपीच्या दुसऱ्या भागात दोन आवश्यक बाबींचा विचार करण्यात आला आहे. मिळणाऱ्या अनुदानाच्या उपयोगासाठी आयएमसीने राज्य सरकारची मंजुरी देणे आवश्यक आहे. पीपीपी मॉडेलच्या पहिल्या भागाबद्दल रुस्तमजी ग्रुपचे लुथ्रा म्हणतात की, यामुळे आयटीआयला मशीन आणि इतर पायाभूत सुविधा मिळण्यासाठी खूप वेळ लागतो. ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक आयटीआयसाठी एक विशेष अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. उदा . रुस्तमजी ग्रुपने गडचिरोलीत सुरू केलेले आयटीआय. हे एक बांधकाम विषयक प्रशिक्षण देणारे उत्कृष्ट केंद्र आहे.
नागोठाण्यात 1984 साली आयटीआयची स्थापना झाली.मात्र त्यात सुधारणा होत नव्हती. परंतु इस्पातने हा आयटीआय चालवायला घेतल्यानंतर मागील 26 वर्षांत झाला नाही असा बदल फक्त 12 महिन्यांत दिसून आला. खासगी कंपन्यांच्या सहभागामुळे आयटीआय विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवतो आहे, असे नागोठणे आयटीआयचे मुख्याधापक लोहार म्हणतात. नव्या व्यवस्थापनाने उद्योगांना आवश्यक असलेल्या, नवीन अभ्यासक्रमांची आखणी केली पाहिजे. जसं संगणक शिक्षण(खास करून मुलींना उपयोगी पडते). आयटीआयमध्ये संगणक प्रशिक्षण केंद्र आणि कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू केला पाहिजे, असेही लोहार म्हणतात. नागोठणे आयटीआयमध्ये सूचना फलकावर आता बॉलयर खरेदी करण्याची योजना आहे, असं सूचना फलकावर लावले आहे. त्यावरून इथे किती पैसा खर्च केला जातो हे समजू शकेल, असेही लोहार यांनी सांगितले.
2009-10 या वर्षात नागोठणे आयटीआय ने 3.5 लाख रुपये विविध कंपन्यांच्या द्वारा मिळवलेल्या कामाद्वारे प्राप्त केले आहेत.या आयटीआयमध्ये सुदर्शन केमिकल , महिंद्रा युजिन स्टील, युरोपॅक मशीन्स आणि एल ऍण्ड टी या कंपन्या विद्यार्थांना काम देण्यासाठी आल्या होत्या. यामुळे या वर्षी 200 हून जास्त जणांना रोजगार प्राप्त झाला आहे.त्यात 18 मुली आहेत. आज येथील विद्यार्थांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ झाली आहे असेही लोहार म्हणतात. याच तऱ्हेने पेण येथील आयटीआयमध्ये नवीन सुधारणा करण्यासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.त्यात नवीन उपकरणे आणि उच्च दर्जाच्या आधुनिक उपकरणांनी अशी सुसज्ज प्रयोगशाळा स्थापनाचे निश्चित केले गेले आहे. मल्टीमिडीया आणि ऍनिमेशन असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचीदेखील योजना आहे. या वर्षी मूर्तिकला हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. पेण हे जगात गणेशमूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर उत्पादनाला अधिक वाव देण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
पीपीपी मॉडेलमुळे व्यवस्थापनाला आयटीआय चालवण्याकरिता लवचिकता प्राप्त होत आहे. उदाहरणार्थ, याआधी प्रत्येक कामासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत होती. त्यांच्या अटीही जाचक होत्या . आता आम्ही नोकरशाहीपासून मुक्त आहोत, असं पेण आयटीआयचे मुख्याधापक नवनीत चव्हाण म्हणतात. आयटीआयवर नियुक्त केलेले इस्पात इंडस्ट्रीजचे सल्लागार एम.ए.पाटील म्हणतात बदल लगेच होत नाही, व्हायला वेळ लागतो. खासकरून आयटीआयचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांबाबत आयटीआयमध्ये शिक्षित शिक्षक नियुक्त करायला हवेत.
आयटीआयला व्यवसायासाठी सल्ला देणारे टेक्नोसोल्युशनचे उपसंचालक राजेंद्र पोतदार म्हणतात की, स्थानिक लोकांना आता इथे आयटीआय आहे हे कळू लागले आहे, त्याचे महत्त्व पटू लागले आहे ही आनंदाची बाब आहे. रुस्तमजी ग्रुपचे लुथ्रा याबाबत सहमती दर्शवतात. पोतदार यासाठी जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशाचे उदाहरण देतात. तेथे बेरोजगारी कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षण संस्थांची खूप मदत झाली आहे. आपण आयटीआय शिक्षण आणि संस्कृतीचा आदर केला पाहिजे असेही ते म्हणतात. आयटीआयची संख्या वाढवणे गरजेचे आहे. या वर्षी सरकारने कमावत्या आणि तरुण युवकांना असे विचारले आहे की आयटीआयचे पीपीपी मॉडेलनुसार संशोधन करणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यवहाराचे आचरण होणे महत्त्वाचे आहे. आयटीआय दरवर्षी एक लाख कुशल कामगार तयार करते. 15 ते 29 वर्षं वयाच्या युवकांना डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. असं कार्यकारी संचालक आणि पीपीपी मॉडलचे अभ्यास करणारे अभय अग्रवाल म्हणतात.
मुंबईत इलेक्ट्रॉनिक्स या शाखेतून आयटीआय अभ्याक्रम आठ वर्षांपूर्वी पूर्ण केलेला संदीप घोलप म्हणतो, आमच्या वेळी जर खासगी कंपन्यांनी आयटीआय चालवायला घेतले असते तर मला कंपन्यांमध्ये नेमके काय चालते ते कळले असते. मी प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणूनही काम केलेले आहे. पण कुठेच काही शिकलो नाही. संदीपने प्रशिक्षणार्थी उमेदवाराचा कालावधी पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र सोडले. आता तो एका बीपीओ कंपनीत डाटा एंट्रीचे काम करतो. याच तऱ्हेने जर आयटीआयला खाजगी कंपन्यांचे बळ मिळाले तर देशात रोजगार निर्मिती वाढेल.औद्योगिकीकरणाला प्रोत्साहन मिळेल. मात्र त्यासाठी सतत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.

('एकॉनॉमिक्स टाइम्स' वरून)

Followers